हृदय प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज

पिंपरी,  (प्रतिनिधी) – शिक्षण आणि नोकरीसाठी संघर्ष करत दिवस कंठणाऱ्या पिंपरीतील एका युवकाला हृदय विकार झाला असून त्याला हृदय प्रत्यारोपणाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी 15 लाख रुपयांच्या मदतीची गरज असून समाजातील दानशूर व्यक्‍तींना मदतीचे आवाहन केले आहे.

पिंपरी कॅम्पमध्ये राहणाऱ्या प्रशांत कुचेकर याची ही व्यथा आहे. इतिहास विषयात त्याने बी. ए., बी. एड. शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षक भरतीसाठी शिक्षण संस्था घेत असलेली रक्‍कम बघून त्याने उच्च पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो त्याच विषयातील सेट परिक्षा उत्तीर्ण झाला. महाविद्यालयातही प्राध्यापक होण्यासाठी लागणारी वशिलेबाजी पाहून त्याने विविध महाविद्यालयात “सीएचबी’ करून आपला प्रवास सुरू ठेवला. करिअरसाठी संघर्ष करतानाच या 33 वर्षांच्या युवकाला आणखी एक संघर्ष करावा लागत आहे.

सध्या त्याचे 80 टक्‍के हृदयाचे कार्य बंद असून 15 ते 20 टक्‍केच हृदय काम करत असल्याने हृदय प्रत्यारोपणाची त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. प्राध्यापक होण्यासाठी पैशांची जमवा-जमव करायला धडपडणाऱ्या त्याला आता उपचारासाठी 15 लाख गोळा करण्याची वेळ आली आहे. मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. यासाठी डॉक्‍टरांनी त्याला 15 लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशांतचे खाते असून आयएफसी कोड एमएएचबी 0000410 असा आहे. दानशूर व्यक्‍तींनी प्रशांत कुचेकर यांच्या 60210631939 या खाते नंबरवर पैसे जमा करावे, असे आवाहन त्याचा भाऊ विनोद कुचेकर याने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)