हृदयाच्या स्नायूंच्या बळकटीसाठी कार्निटीन सप्लिमेंट (भाग- १ )

मी माझ्या मित्रपरिवारासह पुण्याजवळच एका शांत ठिकाणी आले होते. रोजच्या कामाच्या गडबडीतून असा स्वतःसाठी आणि आप्तेष्टांसाठी वेळ काढल्यामुळे खरंच खूप छान वाटत होते. ताजी-स्वच्छ हवा, गवतावर चमचमणारे दवबिंदू, ओल्या मातीचा सुगंध, टवटवीत फुले आणि पक्ष्यांची किलबिल… सगळेच वातावरण अगदी अल्हाददायक होते! माझ्या मनात विचार आला, असेच वातावरण कायम आपल्या भोवती असते तर? आपल्याला ना डॉक्‍टरांची गरज पडली असती ना ही गोळ्या-औषधांची! कायम आनंदी आणि निरामय राहिलो असतो आपण कदाचित!!

माझ्या शेजारच्याच खुर्चीत बसलेल्या माझ्या हृदयविकारतज्ज्ञ मित्राकडे – डॉ. गुप्तांकडे मी वळून पाहिले. नेहमीप्रमाणे ते मला काहीतरी विचारण्याच्या तयारीतच होते! कार्निटीन सप्लिमेंट्‌सबद्दल तुम्हाला काय वाटते? लक्षात आहे ना, तेच कार्निटीन (अमिनो आम्ल) जे आपल्या यकृतात आणि मूत्रपिंडात लायसिन व मिथिओनिन पासून तयार होते. कार्निटीनचे सप्लिमेंट आपले यकृत, मेंदू, स्नायू, हृदय आणि पुरुषांमध्ये तर शूक्राणूंमध्ये देखील साठविले जाते.

हल्ली सप्लिमेंट्‌सच्या सुळसुळाटाच्या पार्श्वभूमीवर मला कुठेतरी वाचलेले आठवले- ‘काही सप्लिमेंट्‌स चांगली असतात, काही वाईट असतात तर काही कोणताच परिणाम न करणारी असतात! आपणच विचारपूर्वक ठरवायला हवे की कोणती सप्लिमेंट्‌स किती प्रमाणात वापरायची ते!’

L-carnitine, cetyl- L-carnitine(LCR), L-carnitine L-Tartrate(LCLT) आणि P ropoiny-L-Carnitine (GPLC)हे कार्निटीन सप्लिमेंट्‌सचे नेहमी वापरले जाणारे प्रकार. बौद्धिक व आकलनक्षमता वाढविण्यासाठी वापरले जाते, LCLT शारीरिक क्षमता आणि ताकद वाढविण्यासाठी वापरतात, तर GPLC रक्ताभिसरणातील काही समस्या तसेच पायाच्या स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येते.
पण डॉ. गुप्तांना अचानक
कार्निटीन का आठवले?
मी विचारताच डॉ. गुप्तांनी त्यांच्या नेहमीच्याच शांत आणि हसऱ्या शैलीत उत्तर दिले- कारण लोकांना वाटते की कार्निटीन चरबी (फॅट्‌स) जाळायला मदत करते!

मला एका संशोधनाबद्दल वाचलेले आठवले – कार्निटीन हे आपल्या पेशींमधील तंतूकणिकांचे (mitochondria- शरीरातील ऊर्जानिर्मिती केंद्रे) कार्य उंचावते आणि अधिक ऊर्जा खर्च करण्यास मदत करते. तार्किकदृष्ट्‌या हे बरोबर असले तरी याबाबतीत अभ्यास व्हायला हवा. मेंदूची कार्यक्षमता आणि सावधानता वाढवण्यास कार्निटीन खचितच मदत करते पण चरबी जाळण्याबाबतीत पुरेशा संशोधनाआभावी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे अवघड आहे. अर्धवट माहितीमधून बर्याचदा कार्निटीनची ‘जीवनसत्व ब7’ म्हणून जाहिरात केली जाते; पण कार्निटीन हे जीवनसत्व नाही.

डॉ. गुप्ता पुढे म्हणाले, कार्निटीन स्नायूंची- विशेषत: हृदयरोग्यांमध्ये हृदयाच्या स्नायूंची क्षमता वाढवते
मी म्हटले, बरोबर आहे, कार्निटीनमुळे अशक्त रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते, हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाला असताना दूषित घटकांचा निचरा करण्याचे काम कार्निटीन करते. यामुळे अनेक प्रकारच्या हृदयविकारांमध्ये (dilated cardiomyopathy, arrhythmias, peripheral vascular disease,acute ischemia) कार्निटीन मदत करते. कार्निटीन मज्जतंतूंचे कार्यदेखील सुधारते, वार्धक्‍याचे परिणाम काही अंशी कमी करते. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मात्र कार्निटीनचा काही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे.

आता डॉ. गुप्ता परीक्षकाच्या भूमिकेत शिरले! मग तुम्ही उच्चरक्तदाब असणाऱ्यांना त्यांच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्निटीनचे सप्लिमेंट देता का?
मी विचार करून म्हटले, आपण पूर्वी बोलल्याप्रमाणे कार्निटीन आपल्या शरीरात तयार होतेच. त्यामुळे एखाद्या माणसामध्ये कार्निटीनची कमतरता असल्याशिवाय उगीच सप्लिमेंट्‌स देण्याची गरज नाही. काहीवेळा तर गरज नसताना कार्निटीन घेतल्यामुळे रक्तदाब वाढणे, ताप येणे, फेफरे येणे यासारखे साईड इफेक्‍ट्‌स सुद्धा दिसू शकतात. याबरोबरच हे जास्तीचे कार्निटीन अनेक औषधांच्या कामामध्ये अडथळा ठरू शकते (उदा. Cenucoumarol Warfarin सारखी रक्त पातळ ठेवणारी औषधे). पण ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे अशा व्यक्तींसाठी कार्निटीन उपयुक्त ठरते.

डॉ. मानसी गुप्ता – पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)