हृदयरोगावर गुणकारी असलेल्या कुचल्याचे ‘अन्य’ औषधी उपयोग

कुचल्याच्या विषाने उंदीर मरतात. त्यामुळे त्यास “मुषकविष’ म्हणतात. पाने खाल्ल्यास गुरे मरतात. हे नऊ उपविषात गणले जाते.कुचला, कारस्कर, विषतिंदुक या नावाने ओळखला जाणारा मोठा व ओबडधोबड वृक्ष असतो. पाने चकाकतात. फळ टेंभूर्णीच्या फळासारखे, बी 50 पैशाच्या नाण्याएवढे, एका बाजूला खोलगट व दुसऱ्या बाजूला फुगीर असते. त्यावर पांढरे लोम असतात. बी कुटण्यास अति कठीण; वस्त्रगाळ चूर्ण करणे अशक्‍य असते. चव फार कडू. औषधात साल व बिया वापरतात, कुचल्यामध्ये दोन जहाल विषारी द्रव्य आहेत.

दीपन, पाचनकारी – कुचला कडू, दीपन, पाचन व वेदना कमी करणारी आहे., नियतकाली ज्वरघ्न, बल्य व वाजीकर आहे.

कोणतीही जखम बरी करणारा – बियांचा लेप वेदना कमी करणारा व जखमेतील कुजणे कमी करणारा आहे. सालीचे लेपाने मनोवह व संज्ञावर मज्जातंतूवर परिणाम होतो व वेदना समजणे कमी होते. कुचला हे फार जालीम औषध आहे. तो अल्प मात्रेतच देतात. मोठ्या मात्रेत दिल्यास धनुर्वाताप्रमाणे आकडी येते. संशमनी वटी, विषतिंदुकवटी हे कुचल्याचे प्रसिद्ध कल्प आहेत.

हिवतापात गुणकारी – हिवतापात कुचला फार गुणावह आहे. अल्प प्रमाणात कुचला दिल्यास सर्व शारिरीक क्रिया ठीक होऊन यौवन टिकवण्याकरिता उपयोग होते.

सूजेवर व अर्धांगावर – यकृताला सूज तसेच अर्धांगवातामूळे जर तोंड वाकडे झाले तर कुचला गुणकारी ठरते. अर्धांगाने जर कंबर लुळी पडली तरी कुचलाच्या बियांचा लेप लावावा.

कंपवात, मज्जातंतूच्या बळकटीसाठी – कुचला ही वनौषधी कंपवातातही गुणकारी आहे. याच बरोबर मज्जातंतूंना बळकटी आणण्यासाठी उपयुक्‍त ठरते.

दम्याच्या विकारावर – जर एखाद्या व्यक्‍तीस दमा झाला असेल तर कुचल्याच्या बियांपासून केलेले औषध गुणकारी ठरते.

हृदयरोगावर – हृदय शैथिल्य, हृदयाची धडधड,इत्यादी विकार कमी होतात.
अन्नपचन नीट होण्यासाठी – कुचला ही आयुर्वेदाने मान्य केलेली औषधी वनस्पती आहे. अल्प मात्रेत घेतले असता अन्न कुजणे, कृमी, जंत होण्याचे प्रमाण कमी होते.

जुनाट तापावर – जुनाट ताप झाला असता कुचलाचे औषध गुणकारी ठरते.
जीव घुसमटत असल्यास – जीव घुसमटणे व घाबरल्यासारखे होणे या विकारावर कुचला प्रभावी ठरते. फक्‍त वैद्याच्या सल्ल्याने घेण्याचे प्रमाण ठरवावे.

क्षय झाला असता – क्षय रोगावर कुचला गुणकारी आहे.

थकवा किंवा अशक्‍तपणात – थकवा वाटत असेल किंवा अशक्‍तपणाने शरीर दुर्बल झाले असेल तर कुचला उपयुक्‍त आहे.कुचल्याचे कार्य सोमलाप्रमाणेच आहे. अग्नितुंडी वटी या कृमीवरील बियांची शुद्धी करावी लागते. शेणामध्ये कुचल्याच्या बिया भिजत घालून रोज शेण बदलावे. सात दिवसानंतर कुचल्याच्या बिया टरारून फुगतात. त्यांची वरची तुसे खरवडून काढून टाकावी व बियांचे चूर्ण करावे. अशाप्रकारे कुचला गुणकारी औषध आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)