हृतिक साकारणार ‘…मेलुहा’च्या शंकराची भूमिका?

हृतिकची मुख्य भूमिका असलेला “मेलुहा’ हा सिनेमा लेखक अमीश त्रिपाठी यांच्या “द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या पुस्तकावर आधारित असेल. दिग्दर्शक संजय लीला भंसाळींच्या पुढच्या सिनेमात हृतिक रोशन भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याचं बोलले जाते आहे. याआधीही करण जोहरला या पुस्तकावर आधारित सिनेमा बनवण्याची इच्छा होती.

या सिनेमातील भगवान शंकरांच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावेसुद्धा चर्चेत होती. मात्र ते काही जुळून आले नाही आणि करणने माघार घेतली. पण आता भंसाळींनी या पुस्तकाचे राइट्‌स विकत घेतले असून हृतिक या सिनेमासाठी होकार देणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. संजय लिला भन्साळीचे यापूर्वीचे “बाजीराव मस्तानी’ सध्या शुटिंग सुरु असलेला “पद्‌मावती’ हे इतिहासाचे विडंबन केल्याच्या आरोपावरून गाजले होते. “बाजीराव मस्तानी’वर टीका झाली होती. तर “पद्‌मावती’वर अजूनही टीका होते आहे. आता हृतिक रोशनला शंकराच्या भूमिकेत सादर करून संजय लिला भन्साळीने नवीन वाद ओढवून घेतला नाही, म्हणजे मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)