हृतिक रोशन आणि सुसान खान मुलांबरोबर डिनर डेटवर

हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुसान खान बऱ्याच दिवसांनी एकत्र बघितले गेले. त्यांच्या समवेत रेहान आणि रिधान ही त्यांची मुले पण होती. शनिवारी मुंबईतल्या एका हॉटेलच्या बाहेर हे सहकुटुंब हास्यविनोद करताना बघितले गेले. त्यांच्या समवेत त्यांचे काही मित्रपण होते. हृतिक रोशनला बघताच बघ्यांनी गर्दी करायला सुरुवात केल्यावर सुरक्षा रक्षकांना पुढाकार घेऊन या फॅमिलीला प्रायव्हसी मिळवून द्यावी लागली.

हृतिक रोशन आणि संजय खानची कन्या असलेल्या सुसान खान यांचा विवाह 2000 साली झाला होता आणि 2014 साली ते विभक्‍तही झाले. असे असले तरी सुसान खान रोशन कुटुंबियांच्या सर्वच प्रमुख समारंभांना आपल्या मुलांसमवेत उपस्थित असते. हृतिकच्या सिनेमांनाही ती आवर्जुन आलेली दिसते. गेल्या आठवड्यात हृतिक आणि सुसान हे रेहान आणि रिधान यामुलांसमवेत कॅलिफॉर्नियाला सुटी एन्जॉय करायला गेले होते. त्यांच्या समवेत सोनाली बेंद्रे, तिचा मुलगा आणि “स्वदेस’मधील गायत्री जोशी देखील होते. हृतिकने या सुटीचे फोटोही सोशल नेटवर्क साईटवर शेअर केले होते.

“आयफा ऍवॉर्ड’ च्यावेळीही हृतिकच्या समवेत सुसान उपस्थित होती, हे दिसले होते. इतक्‍यावेळा जर हृतिक आणि सुसान एकत्र आहेत, तर त्यांच्यामध्ये नक्की काही बिनसले आहे की नाही. जर काही बिनसलेच नव्हते तर मग ते सेपरेट तरी का झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)