हृतिकने माजी पत्नी सुजानसाठी खरेदी केले नवे घर

हृतिक रोशनने त्याची माजी पत्नी सुजानसाठी जुहू येथे एक घर खरेदी केले आहे. हे घर हृतिकच्या घरापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. सुजान खान सध्या तिच्या मुलांसोबत अंधेरी येथे भाड्याच्या घरात राहत होती. पण आता ती लवकरचस तिच्या मुलांसोबत नव्या घरी शिफ्ट होणार आहे. 14 वर्षे सोबत राहिल्यानंतर ते वेगळे झाले होते. नुकतेच ऋतिक रोशनने त्याची माजी पत्नी सुजान खानसोबत जुहु येथे ‘बाहुबली 2’ चित्रपट पाहिला. यावेळी ऋतिकसोबत त्याची दोन्ही मुले ऋदान आणि ऋहान सुद्धा होते. मात्र, जुलै 2016 साली सोनाली बेंद्रेने एक फोटो शेअर केला होता ज्यात हृतिक आणि सुजान त्यांच्या मुलासोबत दिसत होते. यानंतर एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुजानने सांगितले होते की, हृतिक आणि मी चांगले पालक आहोत. आम्ही आमच्या मुलांचे उत्तम पालनपोषण करु. त्यामुळेच आता पती-पत्नीच्या बंधनातून मुक्त होऊनही आपल्या मुलांसाठी ह्रतिक आणि सुझान हे आवर्जुन वेळ देत आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीची ते कमी भासू देत नाहीत. एका अर्थाने आपले आदर्श पालकत्व ते कटाक्षाने पाळत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)