हृतिकच्या फोनचे कॉल डिटेल्स कंगणाने मिळवले का ?

सहा महिन्यांपूर्वी कंगणाने हृतिक रोशनविरोधात जे आरोप केले होते. त्यामुळे एक वेगळेच नाट्य बॉलिवूडला बघायला मिळाले होते. हृतिकबरोबर लग्न करायचे होते, असे म्हणणाऱ्या कंगणाने चक्क हृतिकवर कसले कसले आरोपच करायला सुरुवात केली होती. हृतिकने हे सगळे आरोप फेटाळले खरे पण त्यातून कायदेशीर लढाईच सुरू होते की काय असे वाटू लागले होते.

आता या प्रकरणाचा दुसरा अध्याय सुरू होतो आहे. कंगणाचा वकिल रिझवान सिद्दीकीला कॉल डेटा चोरी प्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतरच्या चौकशीमध्ये आणखीन एक तथ्य समोर आले. हृतिकच्या कॉल डेटाच्या माध्यमातून कंगणाने हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठीच हृतिकच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स तिने मिळवले होते, असे आता प्रकाशात यायला लागले आहे.

हृतिकबरोबरच्या भांडणाऱ्या काळात कंगणानेच वकिल रिझवान सिद्दीकीला हृतिकचा मोबाईल नंबर दिला होता. रिझवानने तिला हृतिक रोशनच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स मिळवून दिले आणि त्याच्या आधारे कंगणाने हृतिकला अडचणीत आणण्याचाही प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मात्र कंगणाने असे नक्की कशासाठी केले असावे, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. अद्याप याचे ठोस आणि विश्‍वास वाटावे असे कोणतेही कारण पोलिसांना मिळालेले नाही, असे ठाण्याचे डीसीपी अभिषेक त्रिवेदी यांनी सांगितले.

मात्र कंगणाच्या बहिणीने या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. कंगणाची बहिण रंगोली चंदेल मात्र पोलिसांवरच चांगलीच उखडली आहे. “एखाद्याच्या नोटीसीचे उत्तर द्यायचे असते, तेंव्हा वकिलांना सगळी माहिती सांगायला लागते. कोणाचा मोबाईल नंबर दिला म्हणून काही कायद्याचे उल्लंघन होत नाही. नुसता अंदाज बांधून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे एखाद्या कलाकारावर आरोप होत आहेत. हे ध्यानात घ्यावे. आगोदर पूर्ण तपास करावा, मगच निवेदन प्रसिद्धीस द्यावे.’ असे रंगोलीने डीसीपी त्रिवेदींना टॅग करून ट्‌विटरवर म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)