हुश्‍श… संपली एकदाची परीक्षा!

दहावीच्या बहुतांशी नियमित विषयांचे पेपर संपले
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावीचे काही खास विषय वगळता नियमित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अखेर संपली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी आज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्‍नोलॉजीचा पेपर दिल्यानंतर सुटकेचा निश्‍वास सोडला. यंदा झालेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये बराच काळ संभ्रम होता, मात्र आता सर्व टेन्शन जणू शिक्षकांवर टाकत दहावीचे लाखो विद्यार्थी रिलॅक्‍स झालेले पहायला मिळत आहे.
दहावीचे यंदा पाच पेपर फुटले असल्याचे बोलले जात आहे, बोर्डाकडून मात्र ही बाब अमान्य केली गेली आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात विद्यार्थ्यांमध्येही मोठा तणाव पहायला मिळत होता. राज्यात झालेल्या कॉपी केसेस, पेपरफुटी आणि लोणी काळभोरमध्ये झालेला प्रकार वगळता राज्यात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडल्या. आज पेपर संपल्या संपल्या अनेक विद्यार्थ्यांनी पाणी पुरी, पिज्जा, बर्गरची दुकाने गाठली. गेले अनेक दिवस परीक्षेचे कारण असल्यामुळे बाहेरचे खाणे टाळणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक दुकानांमध्ये जाऊन छान छान पदार्थांवर ताव मारलेला पहायला मिळाला. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आता मित्रमैत्रीणी भेटणार नसल्याचे दु:खही दिसत होते. तर काहींमध्ये पुढे काय होणार याच्या गहन चर्चाही रंगलेल्या दिसत होत्या. एकंदरीतच विद्यार्थ्यांवरचे आणि त्याहूनचही जास्त टेन्शन घेतलेल्या पालकांच्या डोक्‍यावरचे परीक्षांचे ओझे अखेर उतरले असे म्हणायला हरकत नाही. दहावीचा शेवटचा पेपर 24 मार्च रोजी संपणार आहे. 23 मार्च रोजी द्वितीय व तृतीय भाषा (जर्मन/मराठी) घेतलेल्यांचा पेपर आहे तर 24 मार्च रोजी भाषेचाच उर्दू व गुजराथीचा पेपर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)