हुश्‍श…पाणीपुरवठा तुर्तास सुरळीत

किरकोळ तक्रारी : काही भागात उशिराने नियोजन

पुणे – पाटबंधारे विभागाने गुरूवारी दुपारी अचानक पाण्याचे पंप बंद केल्याने महापालिकेची चांगलीच कोंडी झाली होती. मात्र, रात्री उशिरा हे पंप सुरू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने नियोजन केले. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

-Ads-

सुमारे सहा तास हे पंप बंद राहिल्याने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्‍यक पाणी न मिळाल्याने मध्यवर्ती पेठांसह काही भागात रोजच्या वेळेपेक्षा थोडा उशिराने पाणी पुरवठा झाल्याच्या किरकोळ तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

महापालिकेच्या खडकवासला धरणाजवळील बंद जलवाहिनीचे पंप पाटबंधारे विभागाकडून दुपारी साडेचार वाजता बंद करण्यात आले होते. त्यानंतर थेट रात्री दहा वाजता सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्वती जलकेंद्रात शुद्धीकरणाच्या वेळापत्रकानुसार, आवश्‍यक असलेली पाण्याच्या टाक्‍यांची उंची गाठता आला नाही. त्याचा फटका वेळापत्रकाला बसला. प्रशासनाने त्यानुसार काही भागांत अर्धा ते एक तास उशिराने पाणी पुरवठा केला. परिणामी, वेळापत्रकानुसार पाणी न आल्याने ताटकळत राहावे लागल्याच्या किरकोळ तक्रारी करण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)