हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांनी ठेवली रेल्वे रुळावर शिडी

नवी मुंबई : नवी मुंबईत मोटरमनच्या प्रसंगावधानाने पुन्हा एकदा मोठा जीवघेणा अपघात टळला. घणसोली-कोपरखैराणेदरम्यान शुक्रवारी रेल्वे रुळावर शिडी आढळल्याने मोटरमनने लोकल वेळीच थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.
10 ते 12 वर्ष वयोगटातील तीन मुलांनी ही हुल्लडबाजी केली असल्याचे समोर आले आहे. या मुलांनी 17 फूट लांबीची अॅल्युमिनिअमची शिडी तीन वेळा रुळावर ठेवली, जेणेकरून रेल्वेचा अपघात होईल. परंतु दोनदा शिडी रुळावर व्यवस्थित न ठेवल्याने रेल्वेवर काहीही परिणाम झाला नाही. मात्र तिसऱ्यांदा या हुल्लडबाजांनी शिडी रुळावर व्यवस्थित ठेवली आणि अपघाताला निमंत्रण दिले. पण दैव बलवत्तर म्हणून तिसऱ्या लोकलच्या मोटरमनच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने वेळीच रेल्वेला ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. मुलांच्या या बदमाशीमुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)