सातारा,दि.15 (प्रतिनिधी) कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याला हुल्लडबाजी करणाऱ्या बावीस दुचाकीस्वारांच्यावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. कास पठाराचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारीचे अनके पर्याय राबवले जात आहेत. शनिवारी सातारा तालुका पोलिसांनी हुल्लडबाजी करणारे,मोठमोठ्याने गाड्यांचे आवाज काढणारे, बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या एकूण बावीस युवकांच्यावर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांनी या युवकांना प्रत्येकी शंभर रूपये असा बावीशे रुपये दंड वसूल केला. व त्यांना समज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)