हुलावळे फाउंडेशनने पटकावला तेंडुलकर चषक

लोणावळा – लोणावळा रेल्वे ग्राऊंडवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कार्ला येथील प्रशांतशेठ शंकरराव हुलावळे यांच्या फाउंडेशनने अटीतटीच्या लढतीत दिपक नांबियार यांच्या डी. एन. बी. फायटर्स संघाला हरवून सचिन तेंडुलकर चषक सलग दुसऱ्यांदा जिंकला. पाच दिवसांपासून स्पर्धेचा थरार क्रिकेट प्रेमींना अनुभवता आला. आय. पी. एल. प्रमाणे सचिन तेंडुलकर चषक 2018 स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला. प्रत्येक खेळाडूचा लिलाव करून संघ मालकांनी आपली टीम निवडली होती.

स्पर्धेसाठी तीन लाख रुपयांची बक्षिसे होती. सोळा संघांतून चार संघ अंतीम फेरीत पोहचले. प्रथम क्रमांक कार्ला येथील उद्योजक प्रशांत हुलावळे यांचा हुलावळे स्पोर्टस्‌ फाउंडेशन संघ प्रथम आला. त्याचे प्रथम फंलदाजी करून 6 षट्‌कांत 60 धावांचे आव्हान डी. एन. फायटर्स संघ पार करू शकला नाही. दिपक नांबियार यांचा डी. एन. फायटर्स संघ दुसरा आला. बेस्ट बॅटस्‌मन रोहित, बेस्ट बॉंलर सुनिल रेडी, डिलक्‍स दुचाकी गाडी मिळवणारा बेस्ट मॅन ऑफ द सिरीज मावळचा मानकरी आकाश दाभाडे ठरला. खुल्या विभागात पप्पू तोडकरने मनआफद सीरिजचा एलसीडी विजेता ठरला.

-Ads-

लोणावळाचे नगरसेवक व स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल कवीश्वर, रांका डेव्हलपर्सचे धीरज रांका, नितीन मेढे,लोणावळा पोलीस नितेश कावडे, संघ मालक प्रशांत हुलावळे, ओंकार पटेकर, दिपक नांबियार, युनीक परांडा, अलताफ शेख, माजी उपसरपंच चंद्रकांत गायकवाड, सनी हुलावळे, विनायक हुलावळे, सचिन वाडेकर, संदिप गोणते, संदिप शिर्के यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. सागर जुन्नरकर, सुधीर शेलार, अमोल कोंढभर यांनी समालोचक केले. समीर शेख, असिफ शेख, कल्पेश, निलेश लाड, आसिफ कुरेशी हे पंच होते.

प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच खेळाडुला युनीक स्पोर्टस्‌चे अलताफ मुल्ला यांनी जी शॉंकचे घड्याळ व बट दिले. नगरसेवक निखिल कवीश्वर,शहनवाज शेख, रफिक सय्यद, परवेझ शेख, रवी व्यास, असीफ कुरेशी, हनीफ शेख यांनी आयोजन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)