हुरियतच्या अध्यक्षाचा मुलगा दहशतवादी संघटनेत दाखल

श्रीनगर- श्रीनगरमध्ये तहरीक-ए-हुरियतचा नवनियुक्त अध्यक्ष अश्रफ सरईचा मुलगा जुनैद अश्रफ खान हा गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता होता.दरम्यान आता तो  हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला असल्याचं वृत्त आहे. जुनैदचे एके-४७ रायफलसह असलेले  एक छायाचित्र देखील  सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झाले आहे . जुनैदने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून या संघटनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनैद शुक्रवारी अचानक घरातून गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती.मात्र त्यानंतर तो हिजबुल मुजाहिदीनमध्ये भरती झाल्याचं वृत्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)