हुमनी शेतकऱ्यांच्या विकासाला लागलेली कीड

अकलूज- सध्याच्या दुष्काळी स्थितीमध्ये हुमनी ही शेतकऱ्यांच्या विकासाला लागलेली मोठी कीड असून, तिचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकाचा वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय हुमनी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांनी केले .
खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून माळशिरस पंचायत समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी हुमनी कीड नियंत्रण चर्चासत्राचे सदाशिवनगर येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. मोहिते बोलत होते.
या चर्चासत्रास माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते धैर्यशील मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ, बाबाराजे देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोहिते पुढे म्हणाले की, हुमनी आळीच्या प्रादुर्भावामुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही आळी पिकाच्या मुळाशी जाऊन मुळे खाते, त्यामुळे पिके वाळतात. या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. शेतात पाणी असेल तर ही आळी पाण्याला टिकत नाही. शेतात सायंकाळी हुमनीचे भुंगे बाभूळ, कडुलिंबच्या पानावर बसतात या झाडांवर किंवा पिकाच्या मुळाशी कीटकनाशके फवारली,तर हुमनीची कीड कायमस्वरूपी जाते. पिकांना सेंद्रिय खत देताना त्यामध्ये कीटकनाशकाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. यानंतर माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तालुक्‍यात हुमनीचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्याचे नियंत्रण करणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करावेत असे आवाहन केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती किशोर सुळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार पंचायत समितीचे पक्षनेते प्रतापराव पाटील यांनी मानले.

  • सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी तालुक्‍यातील 45 हजार एकर ऊस क्षेत्रापैकी सुमारे 11 हजार एकर क्षेत्र हुमणीबाधीत झाले आहे. खासदार मोहिते पाटील यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकारी, सोलापूर यांना हुमणीबाधीत शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)