हुमणी किडीने सव्वा लाख ऊस बाधित

सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रादुर्भाव : शेतकरी अडचणीत 

पुणे – राज्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असले तरी कमी पावसामुळे अनेक ठिकाणी झालेल्या हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. कृषी खात्याच्या वतीने दिलेल्या अहवालानुसार राज्यात तब्बल एक लाख 34 हजार 949 हेक्‍टर क्षेत्रावर किडीची लागण झाली असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच हुमणी किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे हुमणी रोगाने डोके वर काढले आहे. दरवर्षी साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठराविक भागातच या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पण यंदा मात्र सगळ्याच ठिकाणी ही कीड पसरली आहे, अशी माहिती कृषी विभागाचे उपसंचालक एच.पी बाबीतवाले यांनी सांगितले.

राज्यातील अहमदनगर आणि पुणे विभागातच या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. त्यापाठोपाठ सोलापूर विभागात सुद्धा उसावर परिणाम झाला आहे. अहमदनगर विभागात 37 हजार 971 हेक्‍टर क्षेत्रावर तर पुणे विभागात 35 हजार 147 हेक्‍टर क्षेत्रावर ही किड पसरली आहे. सोलापूर जिल्ह्यात 29 हजार 539 हेक्‍टर क्षेत्रावर तर कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजार, सांगली जिल्ह्यात 3 हजार 400,बीड येथे 4 हजार 718 हेक्‍टर क्षेत्रावर लागण झाली आहे.

राज्यात सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या तीन विभागांमधील क्षेत्रात जास्त प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव जाणवत असल्यामुळे सध्या या तीन विभागावर लक्ष देण्यात येत आहे. उसाबरोबर तुर तसेच मूग या पिकांवर काही प्रमाणात हुमणी आढळून आली आहे. त्यामुळे इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे. तशा सूचनाही करण्यात आली आहे, असे बाबीतवाले यांनी सांगितले.

एसएमएसद्वारे माहिती
हुमणी रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी एसएमएसद्वारे या रोगाबाबतची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. पुणे विभागात आत्तापर्यत 10 हजार 267 तर अहमदनगरमध्ये 45 हजार 300 आणि सोलापूरमध्ये 32 हजार शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणती किटकनाशके वापरायची याबाबतचे मार्गदर्शन सुद्धा शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती बाबीतवाले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)