हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावणार

प्रांताधिकारी संजय तेली : थोर क्रांतिकारकांच्या बलिदानदिनानिमित्ताने ध्वजारोहण, अभिवादन

राजगुरूनगर- हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे प्रतिपादन खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले.

हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकामध्ये हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या थोर क्रांतिकारकांच्या बलिदानदिनानिमित्ताने ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी प्रांताधिकारी संजय तेली बोलत होते.

यावेळी हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, रमेश घाटपांडे, प्रशांत राजगुरू, प्रसाद राजगुरू, रवींद्र पिंगळे, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, आमदार सुरेश गोरे, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, भीमशक्‍ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप करंडे, शिवसेना जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, कॉंग्रेसचे सतीश राक्षे, सोमनाथ दौंडकर, पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, तहसीलदार सुचित्रा आमाले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, सुशील मांजरे, शैलेश रावळ, विठ्ठल पाचारणे, विश्वनाथ गोसावी, संजय नाईकरे, नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी यांच्यासह मोठ्या संख्येने हुतात्मा राजगुरूप्रेमी उपस्थित होते.

दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस स्थानकाच्या आवारात उभारण्यात आलेल्या हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू या थोर क्रांतिकारकांच्या स्मृतीशिल्पांना विविध पक्षाचे नेते, शासकीय अधिकारी संघटना आणि संस्थांच्या प्रमुखांनी, सामाजिक धार्मिक कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार राम कांडगे, दिलीप मोहिते पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, सरकारी वकील रजनी नाईक, अरुण मुळूक, कॉंग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा वंदना सातपुते, देवेंद्र बुट्टे पाटील, विलास कातोरे उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांचे कार्य महान आहे. देशासाठी बलिदान देण्याचे त्यांच्यात अधम्य साहस होते. देशात 70 टक्के तरुण आहेत मात्र, त्यांची अवस्था पाहता मन खिन्न होते, असे त्यांनी नमूद केले.

  • स्मारकासाठी हवे ते सहकार्य
    हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी आमच्या कुटुंबाकडून पाहिजे ते सहकार्य दिले जाईल. या कामाला केंद्र आणि राज्यशासनाकडून भरीव निधीची तरतूद लवकर व्हावी अशी अपेक्षा हुतात्मा राजगुरू यांचे भाचे रमेश घाटपांडे यांनी व्यक्‍त केली.
  • विकास आराखडा शिखर समितीकडे सादर केला आहे. साधारणता 85 कोटीच्या जवळपास आराखडा बनविला आहे. आराखड्यात सर्वच बाबींचा समावेश केला असून तो मंजुरीसाठी आमचा सातत्याने पाठपुरावा आहे.
    – अतुल देशमुख, अध्यक्ष, हुतात्मा राजगुरू स्मारक समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)