हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी निधीचा “बुस्ट’ द्या

राजगुरूनगर- गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्‍न निधी अभावी प्रलंबित असून त्यासाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवर यांच्याकडे केली आहे.
जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रथम 25 कोटी त्यानंतर 56 कोटीचा आराखडा बनवण्यात आला. ऑक्‍टोंबर 2016 मध्ये 78 कोटीचा आराखडा सामान्य विभागाकडून मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. 2017 मध्ये मुंबई येथील मंत्रालायात हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी पुन्हा नव्याने 82 कोटीचा आराखडा सादर करण्यात आला. त्यानंतर सर्व शासकीय विभागाचे एकत्रीकरण करून त्यांच्या माध्यमातून 86 कोटी 35 लाख रुपयांचा नव्याने आराखडा बनविण्यात आला आहे. मात्र, त्यासबंधित अजूनही निर्णय होत नाही. आराखड्यांची ही शर्यत गेली अनेक दिवस सुरु असली तरी या आराखड्यांच्या शर्यतीत हुतात्मा राजगुरू यांना न्याय मात्र मिळत नाही.
दरम्यान, राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून राजगुरुनगर नगरपरिषद सक्षम असून पहिल्या टप्प्याचे काम करण्यास निधी उपलब्ध करण्याची मागणी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळस्मारकाच्या कामातील भूसंपादनासाठी 14 कोटी 50 लाख, मोठे पूल व वाहन तळ उभारण्यास 10 कोटी 80 लाख, नवीन पोहोच रस्ता आणि वाहन तळ उभारण्यास 3 कोटी 42 लाख, अंतर्गत रस्ता फुटपाथ आणि पदपथ बनविण्यासाठी 5 कोटी 25 लाख, रीटेनिग वॉलसाठी 4 कोटी 60 लाख, साईड डेव्हलपमेंट अंतर्गत गेट, सरंक्षक भीत व सुरक्षा यासाठी 3 कोटी 50 लाख असा 42 कोटी 07 लाख रुपये निधी राज्य शासनाने तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. याबाबत पालकमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मारकासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले आहे. नगरपरिषदेच्यामाध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी 42 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. स्मारकाचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.
    -शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगरपरिषद

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)