हुतात्मा राजगुरुंना अभिवादन

राजगुरूनगर -भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमिताने त्यांना आज राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावरील हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
शहीद दिनानिमित्ताने राजगुरुनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंदेमातरम संघटनेचे संजय नहार, हुतात्मा राजगुरू यांचे पुतणे सत्यशील राजगुरू, स्वातंत्रवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस उपाधीक्षक राम पठारे, तहसीलदार विठ्ठल जोशी, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, नायब तहसीलदार राजेश कानसकर, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, जिल्हा संघटक विजया शिंदे, गणेश सांडभोर, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष मोहिनी राक्षे, स्वच्छता दूत विक्रांत सिंग, जि. प. सदस्य शरद बुट्टेपाटील उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, दिलीप मेदगे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, देवेंद्र बुट्टे, मुकुंद आवटे, सरकारी वकील रजनी नाईक, वकील संघटनेचे अध्यक्ष अनिल राक्षे, मारुती सातकर यांचासह जिल्ह्यासह तालुक्‍यातील विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महाविद्यालयातील व पोलीस अकादमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील हुतात्मा राजगुरू स्मारकात हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)