हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावी क्रांती कविसंमेलन

पिंपरी – हा स्वदेशीधर्म आमुचा , लागला ध्यास बाबू गेनूला,
तिरंगा घेऊन आडवा गेला, इंग्रजांच्या त्या हो गाडीला,
कमवुनी नाव तो गेला, हुतात्मा बाबू गेनू झाला…
जेष्ठ साहित्यिक व शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांच्या या देशभक्तीने ओतप्रोत कवितेच्या ओळींनी राष्ट्रभक्ती जागवली.
9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरातील कवींनी हुतात्मा बाबू गेनू यांचे आंबेगाव तालुक्‍यातील जन्मगाव असलेल्या महाळुंगे पडवळ, येथे जाऊन शहीद बाबू गेनू यांच्या आठवणी कवितेतून जागवल्या.बाबू गेनू यांचे जन्मस्थळ,स्मारक व हुतात्मा बाबू गेनू विद्यालय, असे तीन ठिकाणी कविसंमेलन झाले.कवीसंमेलनाचे अध्यक्ष शिवाजी शिर्के तर प्रमुख पाहुणे प्रा. तुकाराम पाटील होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिर्के म्हणाले, क्रांतिकारकांच्या धमन्यातील रक्त ब्रिटीशशाहीवर पेटून उठले .आपणही त्याच रक्तमांसाचे आहोत.म्हणून जिथे वावगे दिसेल तिथे तरुणांनी आक्रमक झाले पाहिजे. प्रा.तुकाराम पाटील म्हणाले, जगातील कोणताही बदल आपोआप होत नाही.त्यासाठी उत्तम आणि विचारशील कृती करावी लागते,जी बाबू गेनू यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या क्रांती कविसंमेलनाला बाबू गेनू यांचे पुतणे पांडुरंग सैद,किसन सैद,सरपंच तुकाराम आवटे, ग्रामविकास अधिकारी मनोज भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ चासकर, शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कवयित्री राधाबाई वाघमारे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

“भारत माता की जय’, “वंदे मातरम’ या घोषात बाबू गेनू यांना वंदन करून कविसंमेलनाला सुरुवात झाली . बाळासाहेब घस्ते यांनी “ए मेरे वतनके लोगों’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. आईची महती अनिल दीक्षित यांनी कवितेतून सांगितली. कवी सुभाष चव्हाण, आय. के. शेख, तानाजी एकोंडे, मधुश्री ओव्हाळ, अंतरा देशपांडे, आत्माराम हारे, रघुनाथ पाटील, डॉ. पी. एस. आगरवाल, उमेश सणस यांनी देशभक्तीच्या हुंकाराच्या कविता सादर केल्या.
शोभा जोशी यांनी मुलांसमवेत “1942चा क्रांतिदिन 9 ऑगस्ट’, ही रचना सादर करुन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. प्रकाश घोरपडे यांनी भैरवी म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. सुरेश कंक यांनी सुत्रसंचालन केले.बाबू गेनू विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब खानदेशे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)