हुडकोवासियांची घरे नावावर करा

शिरूर- शिरुर शहरातील हुडकोवासियांची घरे नावावर व्हावीत, याबाबत हुडकोतील नागरिकांनी सोमवार (दि.2 एप्रिल) पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, पालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांना निवेदने देण्यात आली आहेत.
या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिरुर नगरपालिका हद्दीतील हुडको रहिवाशांच्या घरांचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सन 2005 पर्यंत हुडकोवासियांनी आपल्या घराचे सर्व कर्जे फेडली आहेत. शिरुर नगरपरिषदेने सन 2014 मध्ये केलेल्या आवाहनाला हुडकोतील नागरिकांनी प्रतिसाद देऊन प्रत्येकी 20 हजार रुपये नगरपरिषदेकडे जमा केले आहेत. 2005-2018 या कालावधीत प्रशासन आणि सत्ताधारी यांनी लक्ष दिले नाही. शासनाने 2011 पर्यंतच्या झोपडपट्टया आणि अनधिकृत बांधकामे कायम करण्याचा निर्णय घेतलेला असताना शासनाने राबविलेल्या हुडको योजनेतील घरे लाभार्थ्यांच्या नावावर होण्यस विलंब का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सर्व घटनांची गाभिर्याने दखल घेण्यासाठी सोमवार (दि.2 एप्रिल) पासून शिरुर नगरपरिषदेसमोर सत्याग्रही धरणे आंदोलन करण्याचा इशारा हुडकोवासियांनी दिला आहे. यावेळी अविनाश जाधव, शैलेश जाधव, कलिम सय्यद, अजिंक्‍य तारु, प्रसन्न भोसले, वैभव पडवळ, अभिषेक थोरात, आदेश बारगळ, कय्यूम शेख, शुभम बांडे, अमित पंडित, वसिम शेख, पंकज जाधव, दीपक करडे, अतुल कोठवळे, विनायक तुबाकी, तुषार वेताळ, समीर शिंदे, उमेश शेळके, प्रविण तुबाकी, ऋषिकेश कंदलकर, अमित अभंग, सागर पांढरकामे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)