हुकूमशाह किम जोंग ऊनच्या हत्येसाठी दक्षिण कोरियाने तयार केलं प्रशिक्षित सैनिकांचं पथक

सेऊल : 1960च्या दशकात जेव्हा उत्तर कोरियाच्या कमांडोंनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती भवनाला लुटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दक्षिण कोरियानं गुप्तरीत्या जेलमधील काही कैद्यांना उत्तर कोरियामध्ये घुसून त्यांचा हुकूमशहा किम उल-संग याला मारण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. आता त्यांचे नातू किम जोंग ऊनसुद्धा स्वतःच्या मिसाइल प्रोग्रामला प्रोत्साहन देतायत. त्यामुळे सेऊल सरकार पुन्हा एकदा प्योंगयांगच्या नेतृत्वाला निशाणा बनवण्यासाठी एक खास युनिट तयार करत आहे. त्या युनिटला खास करून गळा चिरण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.

उत्तर कोरियाच्या सहाव्या सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब चाचणीच्या एक दिवसानंतरच दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री साँग यंग मू ने यांनी यांची घोषणा केली होती. या वर्षाच्या शेवटाला एक खास फोर्स तयार करण्यात येणार आहे. त्याला संरक्षण मंत्र्यांनी डिकॅपिटेशन युनिटचं नाव दिलं आहे. ज्याचा उद्देश उत्तर कोरियाच्या नेत्यांचा गळा चिरणं आहे. उत्तर कोरियाला कडक इशारा देण्यासाठी दक्षिण कोरिया हे युनिट बनवत आहे. संरक्षण अधिका-यांच्या मते, या युनिटमधली हेलिकॉप्टर आणि हवाई जहाजे सीमा पार जाऊन रेड टाकण्यासाठी सक्षम असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)