हुंड्यासाठी महिलेचा छळ

पिंपरी – लग्नात हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेला मारहाण करत तिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आभाष श्रीमाल (रा. हिंजवडी, मूळ रा. मंदसार राजस्थान) व इतर तीन जणांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात 34 वर्षीय पीडितेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला लग्नाच्या काही दिवसानंतर म्हणजे 2009 पासून पीडितेच्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून पीडितेने पती व सासरच्या मंडळींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)