‘ही’ राष्ट्रवादीची बौद्धिक दिवाळखोरी – भाजप

मुंबई: निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल. परंतु त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

फडणवीस नेहमी नैतिकतेच्या गप्पा मारतात. पारदर्शक कारभार असला पाहिजे असे सांगतात आणि दुसरीकडे स्वत:वरील दोन गुन्हे लपवणे हा किती पारदर्शक कारभार आहे, हे याच्यातून सिध्द झाले आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसला भाजपाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नोटीस बजावली गेली असताना या घटनेचे भांडवल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही त्या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे गेल्या 15 वर्षांतील उद्योग जनता विसरलेली नाही. न्यायालयाने सणसणीत चपराक देऊनही अनेक नेते मंत्रीपदाचे मुकुट मिरवत राहिलेले राज्याने पाहिले आहेत. काही नेते जेलचा अनुभव घेऊन आले. तर काहीजण आजही जेलमध्ये आहेत, असाही टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)