‘ही’ ब्लॉकबास्टर जोडी ‘टोटल धमाल’ फिल्ममध्ये झळकणार

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ९० च्या दशकातील ‘ही’ सुपरहिट जोडी तब्बल २० वर्षानंतर पुन्हा पडद्यावर एकत्र झळकणार आहे. इंद्र कुमार यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ या फिल्म माधुरी आणि अनिल एकत्र काम करणार आहेत. या फिल्मचे शूटिंग आजपासून सुरु करण्यात आले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना इंद्र कुमार म्हणाले की, ‘बेटा’ फिल्मच्या शूट नंतर साधारण २६ वर्षांनी आम्ही तिघे पुन्हा एकत्र आलो आहोत. या ब्लॉकबास्टर जोडीसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. या फिल्ममध्ये अनिल आणि माधुरी पती- पत्नीची भूमिका साकारणार आहेत. या फिल्मचं एक गाणं शूट करण्यात आलं आहे. या फिल्ममधे अजय देवगण, अरशद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा असणार आहेत

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)