…ही तर वीज ग्राहकांची लुटमार!

पिंपरी – वीज बिलाचा धनादेश बाउन्स झाल्यास अतिरिक्त दंड आकारून ग्राहकांच्या लुटमारीचा डाव महावितरणने आखला आहे. हा मागे घ्यावा अन्यथा महावितरणच्या विरोधात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.

या संदर्भातील उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महावितरणच्या चेक बाउन्ससाठी 1500 रुपये ग्राहकांकडून वसूल करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. 99 टक्‍के धनादेश हे ग्राहकांच्या खात्यांमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असताना देखील ग्राहकांच्या अक्षरी किंवा अंकी रक्कम लिहिताना अथवा किरकोळ तांत्रिक चेक बाउन्स होऊ शकतो. मात्र 1 टक्‍के पेक्षा कमी ग्राहक मुद्दामहून वेळ निभावून नेण्यासाठी धनादेश देत असतात. या 1 टक्‍के ग्राहकांचा त्रास इतर 99 टक्‍के ग्राहकांना का, असा सवाल सौंदणकर यांनी केला आहे.

-Ads-

महावितरणचे ग्राहकांना चुकीचे वीज बील देण्याचे प्रमाण 20 टक्‍के आहे. वीज वापर नसून देखील सरासरी युनिटचे बील देणे, मीटर नादुरुस्त असताना देखील सरासरी वीज बील देणे, रीडिंग न घेता अथवा चुकीचे रीडिंग घेवून बील देणे आदींचा समावेश आहे. वास्तविक अचूक वीज बील देणे महावितरणची जबाबदारी असताना देखील महावितरणच्या त्रुटी मुळे चुकीची येतात. त्यासाठी महावितरण ठेकेदारांकडून 10 रुपये वसूल करतो. मात्र ग्राहकाला वीज दुरुस्तीसाठी संबंधित कार्यालयांमध्ये 10 ते 12 खेटे घालावे लागतात. ग्राहकांना कामावरून सुट्टी देखील घ्यावी लागते यामुळे ग्राहकांचे आर्थिक वा मानसिक नुकसान होते. त्याबद्दल मात्र कोणतीच उपाय योजना केलेली नाही.

ग्राहक हित अबादीत राखण्यासाठी वीज नियमक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांच्या हिताचा विचार न करता वीज नियमक आयोग महावितरण कंपनीला झुकते माप दिल्याचे दिसून येते. जर ग्राहकांच्या वीज वापराचे बिल 200 किंवा 300 रुपयांचे असेल आणि त्यांनी टाकलेला चेक बाउन्स झाल्यास महावितरण त्या ग्राहकास 1500 रुपये बाउन्स चार्ज दंड म्हणून आकारणार हा त्या ग्राहकाला बिलाच्या सात ते पाच पट दंड आकारणी अन्यायकारक आहे. त्यामुळे महावितरणकडूनही चुकीची बिले दिली गेल्यास संबंधित ग्राहकांकडून कोणताही अर्ज न घेता त्यांच्या बिलामध्ये त्वरित दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्याचे आदेश आपण महावितरणला द्यावेत, अशी मागणीही सौंदणकर यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)