हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : कोचीविरुद्ध मुंबईची संघर्षपूर्ण बरोबरी

पुणे: केरळा ब्लास्टर्स एफसी संघाला 1-1 असे बरोबरीत रोखताना मुंबई सिटी एफसी संघाने हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सनसनाटी निकालवीाच नोंद केली. घरच्या मैदानवर विजयाकडे घोदडौड करणाऱ्या ब्लास्टर्सविरुद्ध मुंबईला बदली खेळाडू प्रांजल भूमिजने तारले. त्याने पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे हालीचरण नर्झारीमुळे पूर्वार्धात खाते उघडलेल्या ब्लास्टर्सला घरच्या मैदानावरही विजयी सलामी देता आली नाही. कोचीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ब्लास्टर्सने अपेक्षेप्रमाणे जोरदार सुरवात केली.

 

-Ads-

सुरवातीपासून चाली रचत त्यांनी मुंबईच्या बचाव फळीला स्थिरावू दिले नाही. 24व्या मिनिटाला ब्लास्टर्सला फळ मिळाले. सैमीनलेन डुंगलच्या सुंदर पासमुळे स्लासिवास स्टोजानोविच याने उजवीकडून पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला नर्झारीच्या स्थितीचा अंदाज घेत त्याने चेंडू मारला. नर्झारीने या संधीचे सोने करीत मुंबईचा गोलरक्षक अमरिंदरला चकविले. प्रांजल 70व्या मिनिटाला रेनीयर फर्नांडिस याच्याऐवजी मैदानावर उतरला होता. त्याने 35 यार्डावरून जवळपास कोणी नसल्याचे हेरत अफलातून फटका मारला. त्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंह निरुत्तर झाला. त्याआधी मुंबईवर सुरवातीपासून दडपण होते. तिसऱ्याच मिनिटाला अमरिंदरला सक्रिय व्हावे लागले.

 

महंमद रकिपने उजवीकडून नर्झारीला क्रॉस पास दिला. नर्झारीने डाव्या पायाने डुंगलकडे चेंडू सोपविला, पण अमरिंदरने वेळीच सरसावत चेंडू अडविला. पुढच्याच मिनिटाला ब्लास्टर्सच्या नेमांजा लॅकिच-पेसिच याला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने मुंबईच्या रफाईल बॅस्तोसला अकारण पाडले. 14व्या मिनिटाला ब्लास्टर्सने आणखी एक प्रयत्न केला. मॅटेज पॉप्लॅटनिक याने सुंदर पास दिल्यावर स्टोजोनोविचने डाव्या पायाने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या ल्यूचियन गोऐन याने मैदानावर घसरत चेंडू ब्लॉक केला. चेंडू बाहेर गेल्याने मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही. 18व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या लालरुथ्थाने मुंबईच्या अरनॉल्ड इसोकोला पाडले. अरनॉल्डने टचलाईनजवळ हे घडल्याने फाऊलचा दावा केला, पण ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांना हे पसंत पडले नाही. त्यावरून अरनॉल्ड व त्यांच्यात शाब्दिक चकमक झडली. मुंबईने 21व्या मिनिटाला प्रयत्न केला.

उजवीकडून पाउलो मॅचादोने फ्री किकवर पलीकडील बाजूला ल्यूचियनच्या दिशेने चेंडू मारला, पण ल्युचियनचे हेडिंग स्वैर होते. त्यावेळी फारसे मार्किंग नसूनही ल्युचियनला संधीचा फायदा उठविता आला नाही. 33व्या मिनिटाला मॅचादोने पास दिल्यावर अरनॉल्डने प्रयत्न केला, पण त्याला साथ मिळू शकली नाही. मध्यंतराच्या पिछाडीनंतर मुंबईला 64व्या मिनिटाला संधी मिळाली होती. रेनीयर फर्नांडिसने पास दिल्यानंतर नेटसमोर पुरेपूर वाव असूनही अरनॉल्डने स्वैर फटका मारला. 79व्या मिनिटाला बॅस्तोसने अरनॉल्डला पास दिला, पण ब्लास्टर्सचा कर्णधार संदेश झिंगन याने बरोबरीने धाव घेत चेंडू ब्लॉक केला. अँतिम टप्यात मुंबईचा बदली खेळाडू मॅटियस मिराबाजे याचा फटका धीरजने चपळाईने थोपविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)