हिस्सेदारांच्या बनावट सहीप्रकरणी कोलतेंना कोर्टाचे समन्स

सासवड-पुरंदर तालुक्‍यातील पिसर्वे येथील गट नं. 356 या मिळकतीमधील 1 हेक्‍टर क्षेत्र जय मल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया संस्था यांना खरेदी दिले असून या जमिनीच्या मोजणीसाठी व हद्द कायम करण्यासाठी सासवड येथील उपअधीक्षक भूमिलेख कार्यालयात सामायिक हिस्सेदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांना पुढील कार्यवाहीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. के. जाधव यांनी सासवड पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत लेखी समन्स बजावले आहेत.
याबाबत माहिती अशी, पिसर्वे येथे दादासाहेब नामदेव कोलते, गंगाराम नामदेव कोलते व नवनाथ नामदेव कोलते यांची शेतजमीन असून त्यातील 1 हेक्‍टर जमीन श्री जयमल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेस खरेदी देण्यात आली आहे. या हिस्सेदारांची वहिवाट त्यात असून तिघांचेही क्षेत्र विभाजन झाले आहे; परंतु या क्षेत्राचा फाळणी बारा उतारा आणि हद्दीचे नकाशे भूमी अभिलेखने तयार केले नसल्याने एप्रिल 2016मध्ये संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी स्वतःचे छायाचित्र लावून सहहिस्सेदार म्हणून मोजणीसाठी अर्ज केला. आमच्यापैकी कोणत्याही हिस्सेदारास कल्पना नसताना, विश्वासात न घेता, खोट्या सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादींनी जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तसेच सासवड येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)