हिवाळी ऑलम्पिकमध्ये उ. आणि द. कोरियाचा एकच संघ

सेऊल – दक्षिण कोरियामध्ये यंदा होणाऱ्या हिवाळी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश एकाचा ध्वजाखाली सहभागी होणार असून या स्पर्धेत दोन्ही देशांचा मिळून एकच संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर येण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे. उत्तर कोरियाबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या 9 फेब्रुवारीपासून द.कोरियामध्ये हिवाळी ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही देश एकाच ध्वजाखाली मार्च करणार आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांचा संघ देखील एकच असणार असून यामध्ये दोन्ही देशातील खेळाडूंना सहभागी करून घेतले जाणार आहे. दोन्ही देशांसाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असेल, असे देखील दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

-Ads-

गेल्या दोन वर्षांमध्ये उत्तर कोरियाने सातत्याने केलेल्या अणुचाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कमालीचा तेढ निर्माण झाली होती. यावर चर्चा करण्यासाठी दक्षिण कोरियाने उ.कोरियाला वारंवारपणे आवाहन केले होते. परंतु उ.कोरियाकडून कसलीही प्रतिक्रिया आली नव्हती. सरतेशेवटी नवीन वर्षाच्या सुरुवातील उत्तर कोरियाकडून हिवाळी ऑलम्पिक स्पर्धेत आपले खेळाडू देखील सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली व यानंतर दोन्ही देशांमध्ये या विषयी चर्चा झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)