हिवाळी अधिवेशन सुरु; विरोधकांची सरकारविरोधी घोषणाबाजी 

मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली आहे. पहिल्याच दिवशी आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर, मराठा, मुस्लिमांना आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दुष्काळी मदत मिळावी, या मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या  पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या मांडला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)