हिवाळी अधिवेशनावर धडकणार प्रयोगशाळा कर्मचारी

मायणी – राज्य शासनाने शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर ता. 26 रोजी आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यानी सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्यकारिणीचे सदस्य दशरथ श्रीखंडे यांनी केले. प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी राज्याध्यक्ष भरत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी, आदिवासी आश्रम शाळांचे अठरा हजार प्रयोगशाळा कर्मचारी सहभागी होणार आहेत.

यात प्रयोगशाळा सहाय्यकांना चवथ्या वेतन आयोगापासून केद्राप्रमाणे वेतनश्रेणी न दिल्याने दोन्हीच्या वेतनातील त्रुटी दुरुस्त कराव्यात, सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाने लागू करावा, जोखमीचे काम करणाऱ्या व शिक्षकांना प्रयोगात सहकार्य करून दि. 23 ऑक्‍टोबर 2013 चा आकृतिबंध रद्द करावा. शासन नियुक्त 13 सदस्यीय समन्वय समितीचा सुधारित आकृतिबंध लागू करावा, शिक्षकेत्तर पदे भरावीत आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2003 मध्ये दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता करावी. यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक शाळा,आदिवासी आश्रम शाळा, समाज कल्याण विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परीचर यांनी मुंबईतील धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे सदस्य दशरथ श्रीखंडे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)