हिवाळी अधिवेशनात “राफेल’ कळीचा मुद्‌दा 

विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत
 
नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशन राफेल कराराचा मुद्‌दा कळीचा ठरणार यात काहीही शंका नाही. कारण राफेल घोटाळा हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यावरून आम्ही गप्प बसणार नाही. सगळ्या विरोधकांना एकत्र आणून त्याचा जाब विचारणार, असे कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असे दिसते आहे.

राफेल करारावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी या करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरबदल केले, असा आरोप राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. तसेच स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवणारे मोदी चोर आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.

-Ads-

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसेच राज्यातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही राफेल घोटाळा हा बोफोर्सपेक्षा मोठा आहे, अशी टीका केली आहे. अशातच कॉंग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घोटाळ्यावरून आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर सगळ्या विरोधकांना राफेल घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी एकत्र आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)