हिवरे बाजारला विशेष ग्रामसभेचे आयोजन

File photo

नगर: तालुक्‍यातील हिवरे बाजार येथे जलसाक्षरता परिषद व विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही आज सायंकाळी 6 वा. आयोजन केले आहे. उपक्रमाचे हे 18 वे वर्ष आहे. ग्रामसभेत गतवर्षीच्या कामाचा आढावा व नवीन वर्षाच्या कामाचे नियोजन करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रशासन अकादमी (यशदा) पुणे जलसाक्षरता केंद्रांतर्गत नाशिक विभागातील कार्यकारी अभियंता, उपाभियंता, जलप्रेमी व जलदूत यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामसभेला राज्य जलसंपदा विभागाचे सचिव आर.आर. पवार हे मार्गदर्शन करणार असून, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रामसभेतील विषयांचे प्रोजेक्‍टरद्वारे सादरीकरण करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)