हिवरे तर्फे मिन्हेर येथे घरगुती गॅस वाटप

जुन्नर -हिवरे तर्फे मिन्हेर (ता. जुन्नर) येथे वनविभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले, अशी माहिती वनरक्षक सागर चुटके यांनी दिली. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 25 टक्‍के रक्‍कम भरून यावेळी दोन एलपीजी गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले. यावेळी गॅस सिलिंडरचे वाटप सामाजिक कार्यकर्ते निलेश चव्हाण, सीतेवाडीचे उपसरपंच विकास राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी जयंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होना निगळ, सविता शिशुपाल, विक्रम शिशुपाल यांसह लाभार्थी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नातून तालुक्‍यातील नागरिकांचे वनविभागाशी संबंधित प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निलेश चव्हाण व विकास राऊत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)