हिवरेबाजारमध्ये सर्वरोगनिदान शिबिर

नगर – आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या मातोश्री कै. जानकाबाई भागुजी पवार यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त, तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत सर्वरोगनिदान शिबिर नुकतेच पार पडले.

शिबिरामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तपासणी व उपचार, मूळव्याध व पोटाचे विकार तपासणी व उपचार, दंतरोगासंबंधित तपासणी व उपचार, सांधेदुखी, पित्ताचे आजार, ईसीजी, शुगर, रक्‍तदाब, मधुमेह, थायरॉईड अशा विकारांच्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. शिबिरामध्ये विशेष करून डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवडचे डॉ. संतोषकुमार मस्तुद व त्यांचे सहकारी डॉक्‍टर, तसेच डॉ. चंद्रकांत कदम, हृदयरोगतज्ज्ञ, जीवनदीप हॉस्पिटल, डॉ.भास्कर जाधव, मूळव्याध व पोटाचे विकारतज्ज्ञ, डॉ. चंद्रकांत अकोलकर, डॉ.संजय बोलगे, डॉ.संदीप चोपडे, डॉ.राहुल बोडखे, डॉ.अजित धामणे,डॉ.आबा जाधव, वैभव भोर, अनुप, डॉ.प्रीती पवार, प्रिया पवार, डॉ.योगेश पवार व जीवनदीप हॉस्पिटल, तारकपूरचे सहकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 100 टक्के मुलांचा रक्‍तगट तपासण्यात आला, तसेच सर्व मुलांची दंततपासणी करण्यात आली. या कामी डॉ.महेश तानवडे, पॅथॉलॉजिस्ट व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरामध्ये हिवरेबाजार पंचक्रोशीतील लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी पोपटराव पवार यांनी शिबिरातील उपस्थित डॉक्‍टरांचे स्वागत व सत्कार केला, तसेच शिबिरामागचा उद्देश याबाबतचे मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जीवनदीप हॉस्पिटल टीमने विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)