हिवरगांव पावसा येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील हिवरगांव पावसा येथे 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जलयुक्त शिवार व विविध कामांचा भव्य शुभारंभ समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री राम शिंदे भूषविणार आहे.

संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामासाठी शासनाने भरीव तरतुदी केल्या आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी योजना,निळवंडे प्रकल्प तसेच जलयुक्त शिवार अशा विविध योजनांचा त्यात समावेश आहे या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदासजी बेरड, खा.दिलीपजी गांधी, माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेतील भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, नितिनजी कापसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हिवरगांव पावसा येथील देवगड येथे या कामांच्या शुभारंभानिमित्त भव्य मेळावा आयोजित केला आहे. तरी त्यासाठी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे व हिवरगांव पावसा येथील सरपंच, उपसरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)