हिलरी क्‍लिंटन आणि बराक ओबामा यांच्या टपालात स्फोटके 

वॉशिंग्टन: हिलरी क्‍लिंटन आणि बराक ओबामा यांना पाठवण्यात आलेल्या टपालात गुप्तचर संस्थेला स्फोटक लिफाफे मिळाले आहेत. उदारमतवादी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या न्यूयॉर्कमधील निवासाच्या टपालपेटीत मिळालेल्या पाईप बॉंबनंतर दोन दिवसांनी क्‍लिंटन आणि बराक ओबामा यांच्या टपालात स्फोटक लिफाफे मिळाले आहेत. अर्थातच या स्फोटक लिफाफ्यांपासून हिलरी क्‍लिंटन वा बराक ओबामा यांना कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता कारण नियमित तपासणी यंत्रणेमधून ते त्यांच्यापर्यंत पोहचू शकतच नव्हते.
अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांच्या टपालाची तपासणी करणाऱ्या त्तंत्रज्ञांनी दोन्ही स्फोटक लिफाफे वेगळे केले आहेत.
हिलरी क्‍लिंटन यांना त्यांच्या न्यूयॉर्कजवळच्या शॅपाक येथील पत्त्यावर पाठवण्यात आलेला स्फोटक लिफाफा 23 ऑक्‍टोबरला मिळाला, तर बराक ओबामा यांना त्यांच्या वॉशिंग्टन डीसीमधील पत्त्यावर पाठवलेला स्फोटक लिफाफा 24 ऑक्‍टोबर रोजी मिळाला. दोन्ही लिफाफ्यांमध्ये एफईडी (फंक्‍शनल एक्‍प्लोझिव्ह डिव्हाईस) मिळाल्याचे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
संशयास्पद लिफाफ्यांबाबत आपल्याला माहिती असून त्यांचा तपास चालू असल्याने एफबीआयने सांगितले आहे.
ओबामा यांच्या प्रवक्‍त्याने या बाबत काहीही प्रतिक्रिया न देता पत्रकारांचे गुप्तचर संस्थेचा अहवालाकडे लक्ष वेधले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)