हिरो मोटोकॉर्प निर्यात वाढविणारा प्रकल्प सुरू करणार

चितूर- हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वांत मोठ्या दुचाकी उत्पादकाने आंध्र प्रदेश राज्यात नवीन उत्पादन सुविधेच्या बांधकामाला सुरुवात केली. ही हिरो मोटोकॉर्पची आठवी उत्पादन सुविधा असेल. भारतात या कंपनीच्या पाच जागतिक दर्जाच्या बांधकाम सुविधा आहेत आणि कोलंबिया आणि बांगलादेशात एकेक आहेत. ही कंपनी मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करीत आहे. या प्रकल्पातून तयार झालेले उत्पादन कमी खर्चात लवकर निर्यात केले जाऊ शकणार आहे. ही सुविधा 600 एकरांमध्ये पसरलेली आहे आणि त्यांची स्थापित क्षमता 1.8 दशलक्ष युनिटची असेल आणि ती तीन टप्प्यांमध्ये साध्य केली जाईल.

ही कंपनी उत्पादन सुविधा उभारण्यासाठी 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. हा कारखाना 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या नवीन सुविधेतून या कारखान्यात 2000 नोकऱ्यांची निर्मिती केली जाईल आणि या प्रदेशातील वितरक आणि विक्रेत्यांच्या सहाय्यभूत उद्योग परीसंस्थांच्या निर्मितीद्वारे अतिरिक्त 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कंपनीला त्यांच्या काही महत्त्वाच्या परदेशी बाजारपेठांमध्ये आपली उत्पादने पाठवण्यासाठी या केंद्राचा एक मुख्य ठिकाण म्हणूनही उपयोग होणार आहे.
हा नवीन कारखाना शाश्वत उत्पादनाच्या तत्त्वावर आधारित असेल. भारतातील हिरो मोटोकॉर्पोच्या विद्यमान उत्पादन क्षमता उत्तराखंडमध्ये हरिद्वार, गुरगाव येथे आणि हरियाणामध्ये धारूहेरा, राजस्थानमध्ये नीमारण आणि गुजरातमध्ये वडोदरा येथे आहेत.

या कंपनीच्या परदेशातही दोन उत्पादन सुविधा आहेत- कोलंबिया येथे विलारिका आणि बांगलादेशमध्ये जेसोर- या सुविधा स्थापित करण्यात आल्या आहेत. हिरो मोटोकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाळ म्हणाले की, ही सुविधा पूर्णपणे कार्यरत झाल्यावर, आमची एकूण उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 11 दशलक्ष मोटरसायकल युनिट्‌स आणि स्कूटर्सची होणार आहे, जी 2020 पर्यंत 10 दशलक्ष युनिट आकारमानाचा टप्पा पार करण्याचे स्वप्न लक्षात ठेवून आखण्यात आली असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)