हिरोला विमा ब्रोकिंगचा परवाना

नवी दिल्ली -विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने हिरो इन्शुरन्स ब्रोकिंग इंडिया कंपनीला डायरेक्‍ट – लाइफ अँड जनरल श्रेणीसाठी तीन वर्षांचा ब्रोकिंगचा परवाना जारी केला आहे. सुनीलकांत मुंजाल हे हिरोच्या हीरो एंटरप्राइजचा या विमा व्यवसायचे नेतृत्व करतात. तसेच आता हिरो कॉर्पोरेट सर्व्हिसद्वारे चालविण्यात येणाऱ्या हिरो एंटरप्राइजची हीरो ब्रोकिंगमध्ये स्थलांतर होईल.

हिरो कॉर्पोरेट सर्व्हिसच्या कार्यकारी संचालक शेफाली मुंजाल याप्रसंगी म्हणाल्या की, ब्रोकिंग परवान्यामुळे हिरोच्या मजबूत विमा वितरणला नवीन सहकार्य मिळेल. यामुळे ग्राहकांना अनेक विमा कंपन्या आणि उत्पादनांमधून निवडीची संधी मिळेल. तसेच कंपनीचे वितरण टच पॉइंट्‌स आता ग्राहकांच्या सर्व इन्शुरन्स आवश्‍यकता पूर्ण करतील. सध्या हिरो ऑटोमोबाईल, हॉस्पिटॅलिटी, शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि हवाई वाहतूक क्षेत्रात जनरल इन्शुरन्स सेवा देते. अलीकडेच जीवन विमा क्षेत्रात प्रवेश केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)