“हिरोपंती’नंतर “हाऊसफुल्ल 4’मध्ये कृती सेनन

साजिद नाडियादवालाच्या “हिरोपंती’नंतर कृती सेननने आता “हाऊसफुल्ल 4’च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. साजिद नाडियादवालाच्या “ग्रॅन्डसन एन्टरटेनमेंट’ने कृती सेननबरोबर पुन्हा काम करायला मिळणार याबाबत आनंद व्यक्‍त केला आहे.

“आवर डिम्पी इज बॅक. वेलकम टू द हाऊसफुल्ल फॅमिली’ असे नाडियादवालाने म्हटले आहे. कृतीनेही “हाऊसफुल्ल’च्या फॅमिलीबरोबर पुन्हा काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे. “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग राजस्थानमध्ये सुरू झाले आहे. राजस्थानातील शुटिंगनंतर लंडनमध्ये थोडे शुटिंग केले जाणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार लीड रोलमध्ये असणार आहे. तिच्याशिवाय पूजा हेगडे आणि कियारा अडवाणी या आणखी दोघीही “हाऊसफुल्ल 4’मध्ये रंगत आणणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“हाऊसफुल्ल 4’च्या व्यक्तिरिक्‍त कृती सध्या “अर्जुन पटियाला’ आणि “पानीपत’मध्येही काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे श्री नारायण सिंह यांचा शाहिद कपूर बरोबरचा”बत्ती गुल, मीटर चालू’हा सिनेमा देखील आहे. कृती आणि सुशांत सिंह राजपूत सध्या खूप डेटिंग करत आहेत, असे समजले आहे. सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्यातले अफेअर संपुष्टात आल्यानंतर हे नवीन समीकरण अस्तित्वात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)