हिरे व्यापाऱ्याच्या १२ वर्षाच्या मुलाने निवडला संन्यासी होण्याचा मार्ग

गांधीनगर :आपल्याकडे सहसा १०-१२ हे वर्ष खेळण्या-बागडण्याचे वय असते. या वयात लहान मुलांना फक्त मजा-मस्ती, खेळणे आणि अभ्यास या गोष्टीचे आकर्षण असते. परंतु, या सर्व गोष्टीना सुरतच्या एका हिरे व्यापाऱ्याचा १२ वर्षांचा मुलगा अपवाद ठरला आहे. कारण या चिमुकल्याने त्याच्या समोर असलेले कोट्यवधीचे वैभवाचा त्याग करून वेगळा मार्ग स्वीकारला आहे. अवघ्या 12 वर्षांच्या भव्य शाहने संन्यासी होण्याचा मार्ग निवडला आहे.

जैन धर्मातील साधू होण्याचे भव्यचे स्वप्न होते. भव्यच्या बहिणीने चार वर्षांपूर्वी दीक्षा घेतली होती. त्यातून प्रेरणा घेत भव्यनेही जैन धर्मात साधू होण्याचे आणि दीक्षा घेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानुसार त्याने हा त्याग केला आहे. भव्य हा हिरे व्यापारी दीपेश शाह यांचा धाकटा मुलगा आहे. रेसिंग कार आणि पर्यटन असे महागडे छंद त्याला होते, पण त्यांचाही भव्यने आई वडिलांच्या इच्छेखातरत्याग केला. शाह परिवार खुश आहे. आपल्यापेक्षा वयाने लहान असूनही दीक्षा घेतल्यानंतर तो माझ्यापेक्षा मोठा होईल, त्यामुळे आपण खूप खुश आहोत, अशा भावना भव्यच्या भावाने व्यक्त केल्या.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)