हिरवाईचे स्वप्न ! पुणे विभागात दीड कोटी झाडे लावणार

“माहेरची झाडी’ उपक्रम
माहेरची साडी चित्रपटच्या धर्तीवर “माहेरची झाडी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रानमळा या गावात लग्न, मुलांचे वाढदिवस अशा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी झाड लावून आनंद साजरा केला जातो. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक गावांमध्ये “माहेरची झाडी’ या उपक्रम राबविला जाणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार : विधानभवन येथे आढावा बैठक
राज्यभरात 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट

पुणे – पर्यावरण समतोल राखण्यासाठी 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्यानुसार 2018 मध्ये राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे नियोजनाची आढावा बैठक वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुनगुंटीवार यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. 2017 मध्ये 4 कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. मागील दोन वर्षात निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीनंतर वृक्ष जिवंत राहण्याचे प्रमाण हे 81 टक्के असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुणे विभागात दि.1 ते 31 जुलैदरम्यान 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी 12 हजार 481 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली. तर 2 कोटी 99 लाख रोपे तयार करण्यात आली आहे. याचसह 1 कोटी 17 लाख खड्डे खोदण्यात आले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)