हिमोफिलिया रूग्णांनाही सर्वसामान्य जीवन जगण्याचा अधिकार

हिमोफिलिया रूग्णांसाठी महाराष्ट्र सरकारची उदासिनता कायम- दादा भालेकर
वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगातही हिमोफिलिया रूग्णांसाठी ठोस उपाय योजना होताना दिसत नसून प्रसंगी न्यायालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने महाराष्ट्र सरकारची हिमोफिलिया बाबत आजही उदासिनता कायम दिसत असल्याची खंत हिमोफिलिया सोसायटी अहमदनगर चॅप्टरचे अध्यक्ष पत्रकार दादा भालेकर यांनी व्यक्त केली.

नगर – सर्वसामान्यांप्रमाणे हिमोफिलिया रूग्णांना जीवन जगण्याचा अधिकार असून हिमोफिलिया रूग्णांना स्वत:चे पायावर उभे करण्यासाठी हिमोफिलिया फेडरेशनचे प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन हिमोफिलिया फेडरेशनचे पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष बाळशिराम गाढवे यांनी केले.

जिल्हा रूग्णालयात आयोजीत हिमोफिलिया सोसायटी अहमदनगर चॅप्टर व डे केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हिमोफिलिया पेशंट कॅंम्प प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी हिमोफिलिया फेडरेशनच्या वूमन ग्रुपच्या अध्यक्षा इंदिरा नायर, फेडरेशनचे सचिव दिपक सेन,डॉ.नितीन लोणारे,डॉ.गणेश मिसाळ,डॉ.प्राजक्ता घाडगे,डॉ.ऋतुजा बेदमुथ्था,डॉ.भारती धांबोरे,डॉ.अमृता गवळी,नर्सिंग कॉंलेजचे प्राचार्य पाटोळे,हिमोफिलिया सोसायटीचे अध्यक्ष दादा भालेकर,सचिव वालचंद ढवळे,सयाजी खटके,गोरक्षनाथ भालेकर,अविनाश कराळे,अशिस इरमल,प्रियंका वाघमारे ,अजिंक्‍य पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गाढवे म्हणाले की हिमोफिलिया रूग्णांना सुध्दा सर्वसामान्य माणसा सारखे जिवन जगण्याचा अधिकार आहे.ग्रामिण भागातील रूग्णांना अज्ञानापोटी आजाराचे लवकर निदान न झाल्याने बाल्य अवस्थेमध्येच अपंगत्वाचे प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
याप्रसंगी पुणे चॅप्टरचे धीरज चौधरी यांनी तरूणांना मोलाचा सल्ला देऊन समुपदेशन केले.
इंदिरा नायर यांनी महिलांना मार्गदर्शन करत हिमोफिलियाची महीला ही वाहक असून त्यांना होणारी अपत्यांची बालपणापासून काळजी घेतल्यास या हिमोफिलिया रूग्णांचे सांधे कधीच खराब न होता सर्वसामान्य मुलांसारखे हिमोफिलिया मुलं जिवन कशी जगू शकतात असे महीलांना मार्गदर्शन करत प्रोजेक्‍टवर चित्रीकरण दाखविण्यात आले.
याप्रसंगी डॉ.पाटील,डॉ.पाटील,डॉ.भारती धांबोरे,दिपक सेन यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी गोवा,गुजरात,मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील हिमोफिलिया प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अहमदनगर चॅप्टरचे अध्यक्ष दादा भालेकर यांनी केले तर आभार वालचंद ढवळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)