हिमेश रेशमिया दोन वेळा करणार हनिमून

बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझ्न सुरू झाला आहे. पहिल्यांदा सोनम कपूर, मग नेहा धुपिया आणि लगेच नंतर हिमेश रेशमियाच्या लग्नाची बातमी आली. मुंबईत लोखंडवाला कॉम्प्लेक्‍सच्या एका अपार्टमेंटमध्ये काही निवडक मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हिमेशने लग्न उरकले होते. टिव्ही कलाकार सोनिया कपूर बरोबर त्याने गुपचूप केलेल्या लग्नामध्ये फारसे स्वारस्य वाटण्यासारखे नाही. मात्र त्याच्या लग्नाबाबतची एक गोष्ट मात्र नक्कीच चवीने वाचण्यासारखी आहे. एकिकडे सोनम कपूरने आपल्या शुटिंग आणि कान फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावण्यासाठी हनिमूनचा बेतच रद्द केला. तर दुसरीकडे हिमेश रेशमियाने तर चक्क दोन वेगवेगळ्या देशांमध्ये दोन वेळा हनिमून करण्याचा बेत केला आहे.

 

 

हिमेश आणि सोनिया कपूर पहिल्यांदा दुबईला आणि नंतर जपानला हनिमूनला जाणार असल्याचे समजले आहे. रविवारी ते दोघे दुबईला रवाना झाले आहेत. तिथे सोनियाला काही शॉपिंग करायची आहे. सोनिया ही केवळ टिव्ही ऍक्‍ट्रेस नाही, तर हिमेशची स्टाईलिस्टही आहे. हिमेशच्या पुढच्या दोन सिनेमांसाठी ती हिमेशचा लुक डिजाईन करणार आहे. त्यासाठीच दुबईत जाऊन काही ट्रीटमेंट आणि शॉपिंग करण्याचे काम ही जोडी करणार आहे. दुबईवरून आल्यावर 19 मे रोजी कानपूरमध्ये हिमेशला एक शो करायचा आहे. या हनिमून नंतर बॉलिवूडच्या मित्रमंडळींसाठी त्यांचे रिसेप्शन होणार आहे. त्यानंतर टोकिओमधील एका शो साठी हे दोघे जपानला जाणार आहेत, तिकडे त्यांचे दुसरे हनिमून होणार आहे.

हिमेशचे हे दुसरे लग्न आहे. हिमेश आणि त्याची पहिली पत्नी कोमल यांचे वैवाहिक आयुष्य तब्बल 22 वर्षे टिकले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान हिमेश आणि सोनिया कपूर यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून अफेअर सुरू होते. हिमेशचा मुलगा स्वयमनेही सोनियाला पसंत केले होते. अर्थात तो आता तरुण झाला असल्याने त्याच्यात समंजसपणा आला असेल आणि त्याने वस्तुस्थिती स्वीकारली असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)