हिमालयातील गिर्यारोहण मोहिमेसाठी महिलांचे पथक रवाना

कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवला
नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील माऊंट मणिरंग या शिखरावरील गिर्यारोहण मोहिमेसाठी महिलांच्या पथकाला माहिती आणि प्रसारण तसेच युवा आणि क्रीडा राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार ) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवला. 1993 मध्ये महिलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेसाठी संपूर्ण पथक महिलांचे पाठवण्याच्या निर्णयाबद्दल भारत गिर्यारोहण संघाचे राठोड यांनी कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

19 सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व 1993 च्या पथकातील सदस्य, गिर्यारोहक विमला नेगी करत आहेत. पथकात युवा गिर्यारोहकांबरोबरच 1993 च्या पथकातील 9 जणींचा समावेश आहे. पथकामध्ये उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल , सिक्कीम, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश , हरियाणा,गुजरात, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील मुलींचा समावेश आहे. 24 ऑगस्ट 2018च्या सुमाराला पथक शिखर सर करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.

भारत-नेपाळ महिलांची 1993 मधली एव्हरेस्ट मोहीम, सर्व महिला असलेली पहिलीच मोहीम होती. क्रीडा आणि युवा मंत्रालय पुरस्कृत भारतीय गिर्यारोहण संघाने ही मोहीम राबवली होती. 21 सदस्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व बचेंद्री पाल यांनी केले होते. या ऐतिहासिक मोहिमेने त्या वेळी अनेक विक्रमांची नोंद केली होती.

माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या एकाच मोहिमेत सर्वाधिक 18 सदस्यांचा समावेश, एव्हरेस्टवर चढणाऱ्या एकाच देशातील सर्वाधिक 6 महिला. पथकातील संतोष यादव एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. तर डिकी डोल्मा एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)