हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुर्यकांत 

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुर्यकांत यांची बुधवारी नियुक्‍ती करण्यात आली आहे. न्या. सुर्यकांत हे पुढील नऊ महिने मुख्य न्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळणार आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हे पद एप्रील-2017 पासून रिक्‍त होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजिअमने 10 जानेवारीला न्या. सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली होती. ते पंजाब-हरियाण उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश आहेत. नवनिर्वाचीत सरन्यायाधीश न्या. रंजन गोगाई यांनी आज शपथ घेतल्यानंतर संसदेने त्यांच्या नावाची घोषणा केली. न्या. सूर्यकांत हे जानेवारी 2004पासून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश असून हरियाणाचे ऍड. जनरल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)