हिमाचल प्रदेशात 14 कंपन्यांची वीज तोडण्याचे प्रदूषण बोर्डाचे आदेश

सिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशात 14 कंपन्यांची वीज तोडण्याचे प्रदूषण बोर्डाने आदेश दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांचे पालन न करण्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अध्यक्ष आर के रुथी यांनी दिली आहे. प्रदूषण नियंत्रणासंबंधी नियमांची पूर्तता करण्यासाठी पुरेशी मुदत देऊनही आवश्‍यक औपचारिकता पूर्ण न केल्याने बोर्डाने कारवाई केली आहे.

वीज तोडण्याचे आदेश देण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये सिमल्यातील सिंह गेस्ट हाऊस, मनजीत टायर वर्क्‍स, हॉटेल सीता पॅलेस, रूट केनिंग युनिट, फ्रॅस प्रोड्युस इम्पॅक्‍स, पिझ्झा हट, केएफसी, तीन स्टोन क्रशर्स आणि 2 हॉट मिक्‍स प्लांट्‌सचा समावेश आहे.

या सर्व कंपन्यांना प्रदूषण नियमावलीची पूर्तता करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याबाबत काहीच पूर्तता न केल्याने वीज तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)