सिमला- हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात एक खासगी बस कोरड्या नाल्यामध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये किमान 25 जण मरण पावले, तर अन्य 35 जण जखमी झाले आहेत. हा अपघात कुलू जिल्ह्यातील बंजार तालुक्यातल्या दोथ मोर्ह येथे घडला. ही बस सुमारे 300 मीटर खोल दरीतल्या कोरड्या नाल्यामध्ये कोसळली, असे कुलू जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितले.
ही बस गोडा गुशाइनी येथे जात होती. अपघाताचे वृत्त समजताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झले आहे. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह बहेऱ् काढण्यात आले अहेत. जखमींना बंजार येथील स्थानिक रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.