हिमाचल प्रदेशात ढगफुटी; 30 जणांचा मृत्यू

सिमला/ धरमशाला – हिमाचल प्रदेशात कोट्रुपी येथे दरडी कोसळल्याने दोन बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान 30 जण मरण पावले आहेत. काल अरात्रीच्या सुमारास मंडी पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या प्रचंड ढगफुटीमुळे या भागात भूस्खलन झाले. महामार्गावर प्रचंड दरडी कोसळल्याने बस दरीमध्ये कोसळल्या असे हिमाचल प्रदेश परिवहन मंत्री जी.एस. बाली यांनी सांगितले.

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्‍त केली. मदत आणि बचाव कार्य सुरु असून आतापर्यंत 14 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेनंतर मंडी प्रशासनाने मंडी औत भागातील चंदिगड मनाली महामार्गावरील वाहतुक बंद केली आहे. त्याऐवजी कालोटा मार्गे मंडी कुलू मार्गाचा वापर करण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. मुख्यमंत्र्यांनी मृताम्च्या नातेवाईकांची भेट घेऊन सर्व आवश्‍यक ती मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच जखमींवरील पचाराचा खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असेही वीरभद्र सिंह यांनी यावेळी जाहीर केले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)