हिमाचल प्रदेशकडून केरळला ‘औषधांची’ मदत 

शिमला: हिमाचल प्रदेश सरकार व हिमाचल प्रदेश ड्रग्ज मॅन्युफॅक्चोरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी १.७ करोड रुपये किमतीची औषधे पाठवण्यात आल्याची माहिती हिमाचलचे आरोग्य मंत्री विपीन सिंग परमार यांनी दिली.
परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश सरकारने केरळ सरकारच्या मागणी अनुरूप औषधे पाठवली असून यामध्ये प्रामुख्याने अँटिबायोटिक, पेनकिलर, ग्लुकोज या औषधांचा समावेश आहे.  हिमाचल प्रदेश सरकारकडून याआधी देखील केरळला ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)