हिना खानची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

टिव्ही अॅक्‍टर हिना खानला अखेर बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली आहे. गंमत म्हणजे तिच्या शुटिंगची सुरुवात भारतातील स्वर्ग म्हणून समजल्या जाणाऱ्या काश्‍मीरमधून होते आहे. पुंछ जिल्ह्यातल्या सुरनकोटमधील प्रोड्युसर तारिक खानच्या “नई दुनिया’मध्ये ती काम करणार आहे. अन्य कलाकारांबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलालपण यामध्ये असणार आहेत.
हिनाने याआगोदर “यह रिश्‍ता क्‍या कहलाता है’ ही सिरीयल केली होती. त्याचा टिआरपी खूपच चांगला होता. त्याशिवाय तिने आणखीही काही सिरीयल केल्या होत्या. त्यातील “कसौटी जिंदगी की’मधून तिचे पात्र कोमलिका अचानक गायब झाले होते. तेंव्हाच तिच्या भविष्यातील वेगळ्या योजनांची कुणकुण लागली होती.

एकता कपूरच्या सिरीयलमध्ये स्थान मिळणे ही काही लहान गोष्ट नाही. पण स्वतः हिनाने दिलेल्या स्पष्टिकरणानुसार तिच्या चांगल्या सूनेच्या रोलला एकता कपूरच कंटाळली होती. त्यामुळे आता ब्रेक घेण्याची योग्य वेळ आली आहे, हे हिनाला कळून चुकले होते. तिच्यासाठी सिनेमात काम करण्याची संधी ही त्याचसाठी महत्वाची होती. पण सिरीयलमुळेच ती सिनेमात काम करण्यापूर्वीच घराघरात जाऊन पोहोचली आहे, हे ही तिला मान्य आहे.

“नई दुनिया’ ही एक प्रेमकथा आहे. 90 दशकामधील कारगिल युद्धाच्या पार्श्‍वभुमीवर जम्मू काश्‍मीरमध्ये रंगलेली ही एक प्रेमकथा आहे. सामाजिक पार्श्‍वभुमी आणि रोमॅंटिक कथा असल्याने हिना खूपच खूष आहे. तिचा स्वतःचा रोल अगदी संवेदनशील तरुणीचा असणार आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ही कथा नायिकाप्रधान आहे. त्यामुळे हिरोबरोबर रोमान्स करायला हिरोईन असायला हवी, या आग्रहापोटी तिला हा सिनेमा करायला लागणार नाही. या सिनेमाचे शुटिंग महिन्याभरात संपवून ती पुन्हा “कसौटी जिंदगी की’मध्ये परत येणार आहे. त्यामुळे हा ब्रेक केवळ काही कालावधीपुरता असणार आहे. याची तिने बालाजी प्रॉडक्‍शनला पूर्वकल्पना देऊन ठेवली आहे. आता लवकरच तिच्या “नई दुनिया’चे शुटिंग सुरू होईल. त्यानंतर टिव्ही स्टार हिना खानच्या ऐवजी सिनेस्टार हिना खान अशी तिची ओळख व्हायला सुरुवात होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)